STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

गणराज्य माझे

गणराज्य माझे

1 min
320

भारत गणराज्य असे माझे

दैदिप्यमान इथली संस्कृती

सारे भारतीय बंधू-भगिनी

नसे कधीही अधम विकृती


बंधुवानी उभा पाठीशी या

हिमालयात बर्फाच्या राशी

सह्याद्रीच्या कड्याकपारी

फेसाळे सरिता झऱ्यानिशी


गंगा यमुना कावेरी सरस्वती

झुळझूळती भारतात बारमाही

संत महात्म्यांची थोर पुण्याई

पसरली किर्ती ही दिशा दाही


थाप डफावर शाहिरी-कवींची

थिरकते पाऊल लावणीवरी

भूपाळी अभंग भजने कीर्तने

बळीचे नित्य मनोरंजन करी


प्रेम जिव्हाळा नि माणुसकी

नांदतो सदा या भारतभूमीवर

शिवरायांचा शूरवीर मावळा

प्राणपणाने लढतो सरहद्दीवर


Rate this content
Log in