STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

गणपतीची शाळा

गणपतीची शाळा

1 min
200

कालच भरली होती गणपतीची शाळा।

सगळे झाले गोळा।

करत होते धिंगा मस्ती

आणि खो खो हसण्याचा आनंद होता वेगळा।

घडविले होती ज्याने मूर्ती

जिव त्याचा ओतून

घेऊन जात होते सगळे

एक एक करून।

सासुरवाशीन लेकीसारखं पाठवताना।

येत होते नयना अश्रू

मागे वळून पाहतांना ।

गणपती म्हणे इतक्या मेहनतीने तयार केलं तुला कस विसरू।

दोन महिन्यांपासून तू माझी मूर्ती बनवण्यात होता व्यस्त।

कसा द्यायचा आकार,कशी सोंड , कसा रंग, कसे डोळे , कोणता पितांबर या विचारात तू होता नेहमी अस्वस्थ।

काम माझे करतांना तू कधी कधी जेवत देखील नव्हता।

मूर्ती सुंदर बनवण्याचा ध्यास तुझ्या भक्तीत होता।

तू कलाकार या शाळेचा कला तुझी खूप सुंदर।

सगळेच जातील शाळेतून एक दिवस अश्रू तुझे तू आवर।

शेवटचा एक गणपती राहिला होता घरात।

गेला कलाकार त्याच्याजवळ अन् 

डोक्यावरून फिरवला हात।

शाळा माझी भरण्यासाठी पुन्हा

मनापासून म्हणतो गणपती बाप्पा मोरया ।

पुढच्या वर्षी लवकर या।


Rate this content
Log in