STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

2  

Sushama Gangulwar

Others

गणपती

गणपती

1 min
439

आले रे आले आमचे 

गणपती बाप्पा आले 

उंदीर मामा वर बसून 

घरात विराजमान झाले 


आईने ही आवडीने 

मोदक लाडू केले 

बापाला नैवेद्य वाहून 

आम्हाला ही प्रसाद दिले 


आम्हा बालकांचा तू 

आवडता बाप्पा रे 

आपण मिळून सारे 

मारू गोड गोड गप्पा रे 


संकटातून तारणारा देव 

असे बाप्पा तुला म्हणतात

लहान मुलांचं देव म्हणे 

सारं काही ऐकतात 


तुझ्या आगमनाची सारेच 

वाट पाहतात फार 

धरी वर पसरलेल्या

संकटातून आम्हा तू तार 


Rate this content
Log in