गणपती बाप्पा
गणपती बाप्पा
1 min
352
मातीत खेळणे
आवडते खूप
मातीला देवूया
गणोबाचं रुप
गणोबा राजाची
त्रिलोकी किर्ती
मातीच्या रुपात
सुंदरशी मुर्ती
आपण बनवु
छान छान रंग
मातीच्या गणूचं
रंगवुया अंग
टाकाऊ वस्तूनी
मखरासन बनवू
मोदक पुरीचा
नैवेद्य चढवू
गणोबा शेजारी
चिटूकला उंदीर
घरातच सजलं
गणोबाचं मंदीर
दुर्वा आघाडा
वाहूया चरणी
आरती गायन
गणोबा पुजनी
गणपती बाप्पा
दोस्तांना पावा
सुखा समृद्धीत
सर्वांनाच ठेवा!!!!!
