गणपती बाप्पा
गणपती बाप्पा
बाप्पा तू आलास तेंव्हा
आभाळ आल होत भरून।
पण जातांना चाललास आता आमच्या डोळ्याच्या पापण्या ओलावून।
दहा दिवस कसे गेले कळलेच नाही।
चविष्ट प्रसाद खाऊन पोट अजुन
भरलेच नाही।
तुलाही घरातून जातांना वाईट वाटत असले ना।
पण काय करणार तू आई तुझी घरी वाट बघत असेल ना।
ढोल ताश्याच्या गजरात तू नेहमी आनंदानं येत रहा।
सगळ्या भक्ताची एकच विनंती जातांना कोरोनाच्या महामारीला अदृश्य करून जा।
वेगवेगळ्या मूर्ती तुझ्या सगळ्या सुंदर छान।
हे विघ्नहर्ता तू आहेस सुखकर्ता बाप्पा महान।
म्हणून आज म्हणतो आनंदाने आम्ही गणपती बाप्पा मोरया।
पुढच्या वर्षी लवकर या।
