STORYMIRROR

Padmakar Bhave

Others

2  

Padmakar Bhave

Others

गणिते

गणिते

1 min
82

सोडवावी कशी गणिते जगण्याची

वाट पहावी का त्या पूर्णविरामाची,


किती कोसळला पाऊस ढगांतून

किती पहावी वाट जरा विसाव्याची,


स्वतःशीच लढण्यात उभा जन्म गेला

म्हणते सरकार ठेवा हिंमत लढायाची,


लावा बोल,जगण्याची लावा बोली 

का वाट पाहतो आहे त्या एका बुलाव्याची,


जगेन आता होऊन फिनिक्स पुन्हा

नको कल्पना त्या भिकार मरायाची


Rate this content
Log in