STORYMIRROR

Aruna Garje

Others

4  

Aruna Garje

Others

गणित आयुष्याचे...

गणित आयुष्याचे...

1 min
398

चढ संपला आयुष्याचा

उतार आता झाला सुरू

राहिलेल्या इच्छा आकांक्षा

साऱ्याच आता पूर्ण करू


खाचखळगे काटेकुटे

मागे पडली ती सारी

वळणावरती दिसू लागली

बाग आता फुललेली


पूर्वार्ध सरला सारा आता 

उत्तरार्ध हा झाला सुरु 

सूर्यास्ताला काय भ्यायचे 

स्वागत त्याचेही हसत करु 


आयुष्याचे गणित असे हे 

पायरीपायरीने सोडवायचे 

अधिक उणे चूक बरोबर 

सारेच आता विसरायचे 


Rate this content
Log in