गणेशस्तवन
गणेशस्तवन

1 min

458
वरदविनायका तू गौरीनंदना
गणराया तू गजानन
भक्त तुझे आसुसले
तुला पाहण्या तुला पाहण्या
सुखकारक तू दु:ख निवारक
भक्तांचा तू पालनहार
स्मरणाने तुझ्या नष्ट होती
सकळ चिंता क्षण भरात
नयन रम्य तुझे रूप
आवडे तुला लाडू मोदक
हाती शोभे जास्वंद
कंठी दुरव्याची माळ
विद्या बुद्धीचा तू दाता
कला गुणांचा तू देवता
आराधना तुझी करता
प्रसन्न होई देवी शारदा