गणेश स्तवन
गणेश स्तवन
1 min
484
पार्वती नंदन
शंकर तनया
येई गणराया
आनंदाने ।।१।।
प्रथम पूजेचा
तूच मानकरी
दुर्वांकुर धरी
डोईवर ।।२।।
तुज आवडते
पुष्प रक्तवर्ण
सुपासम कर्ण
देवा तुझे ।।३।।
मूषक वाहन
चाले भराभर
जाई घरोघर
तुझ्यासवे ।।४।।
मोदकाचा लाडू
तुझ्या नैवेद्याला
आवडतो तुला
गजानना ।।५।।
ओंकार स्वरूपा
बुद्धीची देवता
तूच सुख दाता
विनायका ।।६।।
तूच सुख कर्ता
तूच दुःख हर्ता
कर्ता करविता
तूच देवा ।।७।।
नाचता गणेशा
पैंजणाचा नाद
द्यावा आशीर्वाद
भक्तजना ।।८।।
