STORYMIRROR

Anita Bodke

Others

3  

Anita Bodke

Others

गजल

गजल

1 min
314

हा प्रश्न एक माझा माझ्या मनास होता!

माझा कुठे तसाही कोणास त्रास होता!


होत्या हजार जखमा या काळजात माझ्या

हासून राहण्याचा वेडा प्रयास होता!


झालेत काळजाचे तुकडे हजार माझ्या

तो एक वार त्याने केलाच खास होता!


मज वाटले, असावे सारेच आपले पण

कळले किती खुळा हा माझा कयास होता!


होते जिथे पुन्हा मी तेथे फिरून आले

मी कोणत्या दिशेला केला प्रवास होता?


सांगू कसे गळा हा कापून कोण गेले

माझाच श्वास होता!माझाच श्वास होता!


साहित्याला गुण द्या
लॉग इन