STORYMIRROR

Shital Yadav

Others

3  

Shital Yadav

Others

गजल

गजल

1 min
27K


"स्वप्न पाण्यासारखे वाहून गेले''

जीवनाची आस ही हरवून गेले


धावती हे श्वास वेडे आठवांचे

मोजके ते भास ही सोडून गेले


वेगळे होता न आले या जगाशी

घाव हे शब्दात मी सोसून गेले


भोगलेले तेच हे मांडायचे मज

जीवनी नाते वृथा राहून गेले


वेदनांनी का असे आता लपावे

सोसतांना भोग हे जिंकून गेले


खूपदा मी दोष देते तुज नशीबा

पण तुझ्यासाठी बहरण्यातून गेले


Rate this content
Log in