STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Others

3  

.प्रमोद घाटोळ

Others

गझलनुमा

गझलनुमा

1 min
371

पैशासाठी माणूस ......जुळती रास होतो

पुढाऱ्याची जीभ कधी विषारी साप होतो


कोणाची जात पाहू नये न कसायाचा धर्म

उलट्या काळजाचा,आखरी श्वास होतो


द्रव्याचा स्वार्थी धनी , जणू की चौकीदार

निद्रेची भीक मागतो , भिकारी खास होतो


धनाचा भूकेला म्हणती हवी राजसत्ता

मायावी त्या हरिणीचा, सिंहही घास होतो


आपण माणसे सारी, निसर्गाचा पसारा

एका वादळात अख्खा, गाव नाश होतो


महाली धानिक जरी, लोळती पैशा वरती

पाचूचा वासूकी, गळ्यातील फास होतो


 सोन्याच्या विटांनाही ,लागती गच्छंती

नीतीवान झोपडीचा , देवही दास होतो



Rate this content
Log in