STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Others

3  

.प्रमोद घाटोळ

Others

गझलेचा बझर

गझलेचा बझर

1 min
293

रंगीन पक्ष किती अन् , अनेक पाटर्या ह्या

चष्मे साऱ्यांचे वेगळे पण काचां सारख्या ह्या


पुढारी कुणा म्हणावे , शिकारीचं सगळे

झेंडे हातात न्यारे, परंतू वाघोळ्या सारख्या ह्या


कुणी सांगती जात तर, कुणी फासती रंग

बळी पाडणाऱ्या, सूऱ्या सारख्या ह्या


ललना आमची भगिनी, दिवसा सांगतात सारे

रात्रीच्या मुजऱ्यातल्या, नजरा सारख्या ह्या


वेगवेगळ्या घोषणांनी, रंगविल्यात त्यांनी गल्ल्या

थुंकीने पुसणार उद्या, पोतेऱ्या सारख्या ह्या


मटनाच्या उष्ट्या नळयांना, झोंबलेत रानकुत्रे

शिरगिंतीत भेटलेल्या, बोट्या कालच्या ह्या


साऱ्यांचाच एक पक्ष, भाकरी शेकण्याचा

स्वार्थासाठी मांडल्यात, चुली वेगळ्या ह्या !!


Rate this content
Log in