STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

गझल

गझल

1 min
772


नभात चंद्र राजसा इथे तिथे पळायचा

मला बघून सारखा मजेत तो हसायचा...!!


पुढ्यात यायचा सखा हसून सारखा असा

खुशाल बांधल्या मनास मोकळे करायचा!!


सदैव साथ द्यायचा मला खरीच जीवनी

कधी मधे हळूच डाव जिंकता हरायचा...!!


बरेच टाळले खरी कसेतरी सख्यास मी

मनामधे पुन्हा पुन्हा क्षणात तो दिसायचा...!!


तुझीच प्रीत या मनी फुलून रोज येतसे

तुझ्या मनास भाव हा सख्या कधी कळायचा..!!


सुखास जाण माणसा मिळेल जे तुला कुठे

सुखातला हरेक क्षण मनात या भरायचा !!



Rate this content
Log in