STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

गझल कुठे लपायचा

गझल कुठे लपायचा

1 min
335


हळूच हा दिसायचा जरा कुठे लपायचा

मला बघून सारखा मजेत तो हसायचा!!


पुढ्यात यायचा सखा हसून सारखा असा

खुशाल बांधल्या मनास मोकळे करायचा!!


सदैव साथ द्यायचा मला खरीच जीवनी

पसार डाव सोडता कधीच ना हरायचा !!


बरेच टाळले खरी कसेतरी सख्यास मी

मनामधे पुन्हा पुन्हा क्षणात तो दिसायचा!!


तुझीच प्रीत या मनी फुलून रोज येतसे

तुझ्या मनास भाव हा सख्या कधी कळायचा!!


सुखास जाण माणसा मिळेल जे तुला कुठे

सुखातला हरेक क्षण मनात या भरायचा !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन