STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Others

3  

Prashant Tribhuwan

Others

गीताई

गीताई

1 min
338

समजून घेण्यास तिला 

नाही व्हाव लागत शहाणं,

समजेल तिचा प्रत्येक बोल

जर बनून गेले आपण लहान!


तीच आहे आई सर्वांची

दाखवते अडचणीत मार्ग,

ज्ञान ,कर्म अन् भक्तीमध्येच

आहे ह्या पृथ्वीवरच स्वर्ग!


धर्मासाठी बलिदान देण्या

तीच शिकवते मज लढण्या,

सत्मार्ग दाखवते ती भक्तीचा

भगवंता कर्म माझे आवडण्या!


माझ्या या तनाचे पोषण

तर करते माझी जन्मदाती,

पण माझ्या मन आणि चरित्राची

काळजी मात्र तीच घेती!


माझ्या प्रत्येक अडचणीत 

मी तुझ्याचकडे पाहतो,

अन् प्रत्येकवेळी तुझा हात

माझ्या या डोईवरी राहतो!


पाहून तुझ्या अथांग ज्ञानाकडे

मी प्रत्येक वेळी भारवतो,

तुझ्या मार्फतच तो मुरारी

माझ्यात सारे सद्गुण भरवतो!


तुझ्या एका एका शब्दावर

लोकांनी महात्म्य मिळवलं,

अन् प्रत्येक संकटात माझं

मनोबल तूच आहे बळवल!


तिन्ही लोकाचे प्रेम, ऐश्वर्य

मी तिच्याच कुशीमध्ये पाई,

कारण तिचं एकमेव आहे

माझी जन्मोजन्मी गीताई!


Rate this content
Log in