गीता मानवी जीवनाचा आधार !!
गीता मानवी जीवनाचा आधार !!
जीवन जगावे , चूक मानावे
गुण असे जीवनी उतरावे
बोध घ्यावे , चिंतन करावे
आत्म्यास परमेश्वर बोलावे !! धृ !!
कष्ट करावे , लाभ घ्यावे
परमानंदम जीवन जगावे
आदर करावे , अनादर टाळावे
सेवाभावे विनम्र रहावे !! १ !!
मोह टाळावे , संतुष्ट रहावे
कर्मयोग अंगी बाळगावे
सुखी रहावे , दुःख विसरावे
अंगी लालच निजवावे !! २ !!
निश्चयास अटळ रहावे
बोलण्यास तत्पर रहावे
गीतेतील उपदेशांचा प्रभाव
वैयक्तिक जीवनात अंतरी रुजावे !! ३ !!
जाणीव त्यांना प्रत्येकाची
क्षणोक्षणी बदलणारी
धर्म , अर्थ , काम , मोक्ष
साक्ष कैक दाखवल्यांची !! ४ !!
विश्व माझे रूप तूच
विष्णुदेवाचे जसे अवतार
करता करवीता देव माझा
पालनहार ह्या जगतेचा !! ५ !!
तोची सांगे अर्थ गीतेचा
तत्वज्ञानाची अमृतगाथा
काव्य नसे हे जीवनगाथा ह्यात
अठरा अध्याय सातशे श्लोकांचा साठा!!६!!
सर्व जनतेचे ते पालनकर्ता
अखंड विश्वाचे ते विधाता
कृष्ण देव बनूनी अवतरले
आपले हे पालनकर्ता
आपले हे पालनकर्ता !! ७ !!
