गीत गणेशा
गीत गणेशा
रूप तूझे न्याहाळला
डोळे भरून पाहयाला
कंबर साऱ्यांनी खचली
ढोल ताशांच्या ढोल ताशांच्या
गजरात नाचली तुझी गणेश नगरी
ओढ तूझी ध्यानी मनी
पावलांच्या चाहूलांनी
सजली हि तूझी पंढरी
मायचा तू माय बाप भक्तांचा कैवार
भक्त दर्शनी दर्शनी धावली
अशी अनोखी किमया हि सारी
होई गर्दी तुझ्या पाया
नाचल्या या सार्या बाया
कळी फुलांची पाहून फुलली
आदी नमन गणराया
भक्त जणा तूझी माया
सारा गुलाल गुलाल उधळी
जशी रंगीन गोकुळ नगरी
रत्नजडित रूप तूझे
दु:खहरता नाव तूझे
जग गाजे किर्ती तुझी
रूप तूझे न्याहाळला
डोळे भरून पाहयाला
कंबर साऱ्यांनी खचली
ढोल ताशांच्या ढोल ताशांच्या
गजरात नाचली सारी गणेश नगरी
