घुसमट
घुसमट
1 min
181
मन माझे हे असे भरकटलेले
कळत नाही कसे सांगू कोणा
न सांगताच समजावे त्याला
असे वाटते नित्य माझ्या मना...
रमलो ज्या हर्ष क्षणात आम्ही
त्या जपल्या आठवणींच्या खुणा
तू येत नाहीस हे समजताच मग
नयना भरून येतात पुन्हा पुन्हा...
रात्र झाली की तुझे स्वप्न पहावे
उमद्या घोड्यावर तू स्वार होऊनी यावे
तुला पाहताच मी लज्जीत व्हावे...
सर्वांच्या साक्षीने तू मज घेऊन जावे...
असा अचानक निघून का गेलास
घुसमट या जीवाची रे सदा होते
तू परतून येशील पुन्हा माझ्याकडे
सख्या नटून थटून मी तुझी वाट पाहते....
