घटस्थापना
घटस्थापना
आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी,
कुलदेवतेची सारे करूया घटस्थापना,
अखंड दीप प्रज्वलित ठेवूनी मनोभावे,
गाऊया देवीची महती करूनी पूजा अर्चना.
पत्रावळीवर काळी माती घेऊनिया,
सकल धान्याचे पेरूया मोती,
अंकुरे कोंब लागे वाढू जसजसे,
मिळो साऱ्यांना सदाचाराची स्फूर्ती.
घटावरील पात्रात ठेवूनी देवतेची मूर्ती,
करू सप्तशती पाठ,करू देवीची प्रार्थना,
मागू धैर्य आणि शुभ आशिष देवीला,
करण्या व्यभिचारी दुष्ट प्रवृत्तींचा सामना.
घट पवित्रतेचा मांगल्याचा स्थापूनी,
नवरात्रीत करूया आई जगदंबेचा जागर,
नऊ दिवसांचे नऊ रंग दाविती देवीची विविध रूपे,
या विविध रूपांना स्मरूण करूया नारीशक्तीचा आदर.
