घरटं
घरटं


पक्ष्यानं राहायचं असतं आपल्या घरट्यात सुखी
सतत आनंदानं गुणगुणायचं असतं राहायचं हसतमुखी
सोसायची असते जरी कितीही करावी लागली वणवण,
पोटाची खळगी भरण्यासाठीच उडायचं सर्वत्र क्षणक्षण
पिलांचं करत पालनपोषण व्हावं त्यानं तृप्त
लढत राहायचं असतं, वातावरण असो शांत वा तप्त
एक दिवस उडून जातात पिलं मोठी झाल्यावर
जसा येतो उन्हाळा तशीच येते पावसाची सर
कधीतरी हीच सर उद्ध्वस्त करते घरटं
कुठं चुकलं हाच प्रश्न सतत स्वतःला विचारत राहतं त्याचंच मन चोरटं
त्यांनाही असतात वाटा आणि आकांक्षांची स्वप्नं
घेऊन भरारी आकाशात सगळं मनाशी जपणं
कधीतरी पिलं येतील फिरुन या आशेवर सतत राहायचं असतं
आपल्या भूतकाळाला वर्तमानात डोकावताना फक्त पाहायचं असतं.