घरटं जिद्दीचं...
घरटं जिद्दीचं...
1 min
437
काड्या काड्या वेचुनी
जाळीदार विणेत गुंफला
इवल्या चोचीच्या साह्याने
सुगरणीने खोपा बांधला।
नाही शेण नाही मेण
नाही दगड, नाही वीट
रेखीव तिच्या कौशल्याचे
गावे किती सारे गीत!
आकाशी घेतली भरारी
जमवल्या काड्या एक एक
कष्टाने साकारले स्वप्न
यश पाहत आहेत अनेक
देते, सार्यांना मंत्र यशाचा
करा प्रयत्न सातत्याने
परिस्थीती काही असो
शिका लढायला एकट्याने।
