STORYMIRROR

Prajakta Waghmare

Others

3  

Prajakta Waghmare

Others

घरटे तुझे नि माझे

घरटे तुझे नि माझे

1 min
293

प्रेमाने विणूयात

विश्वासाने जपुयात

आपुलकीने टिकवूयात

घरटे तुझे नि माझे


ऊन पावसात टिकवू

सुख दुःखात भक्कम करू

स्वार्थापासून वाचवू

घरटे तुझे नि माझे


थोरामोट्यांच्या आशीर्वादात वसवू

तुझं माझं न करता आपलं मानू

एकमेकांच्या साथीने बहरवू

घरटे तुझे नि माझे


सुंदर स्वप्नांनी रंगवूयात

अतूट नात्यांची तोरणे बांधूयात

मेहनतीने सजवूयात

घरटे तुझे नि माझे...



Rate this content
Log in