घरटे चिमणीचे ....!
घरटे चिमणीचे ....!
नित्यनेमाने एक चिमणी
माझ्या घराच्या दर्शनी दरवाज्यावर
येऊन बसते माहेरवाशीण सारखी ....
ती मनसोक्त चोच घासते दरवाज्यावर ,
टकटक आवाज करते , अन
अंगही घासते दरवाज्यावर ....
चिमणीचा हा नित्यक्रम
मी रोज न्याहाळतो ,
अन वाटते ....
का बरे ती येत असेल रोजच
या दरवाज्यावर ....?
मनात तर विचारांचं काहूर उठते ... !
माझ्या घराला सजविणारे
दरवाज्याचे लाकूड
तिचे घरटे असलेल्या
झाडाचे तर नसेल ....?
अशावेळी चिमणीचं होऊन जाते झाड
माझ्या मनाचं ....!!!!
