घरकूल
घरकूल
1 min
16
नभातील ढग झाले
छानदार काळे काळे
पाऊसधारा बरसून
नभ होईल निळे निळे...
पावसातील भिजतील
सार्याच या वृक्षवेली
मनही होतील चिंबचिंब
सर्वांचीच हो आपली...
कवी करतील सारे
कविता हो पावसाच्या
व्यथा येतील मनातून
अंतरातून सर्वांच्या...
घाटातील वाट सुरेख
हिरवाईने छानसजते
वसुधा हिरव्या हरीत
शालूत छान नटते...
पावसात सारे जाती
आपल्या घराला
चिमणी पाखरे कशी
विसरतील घरट्याला...
घरकुल माझेही आहे
खूपच छान छान
कुटुंबातील माणसे
सारीच आहेत महान...
