Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mahesh Raikhelkar

Others

3  

Mahesh Raikhelkar

Others

"घरातील ईश्वर"

"घरातील ईश्वर"

1 min
466

आई म्हणजे असते आपल्यातील ईश्वर

मूल पहिल्यांदा बोले `आई ' हेच अक्षर !

आई म्हणजे असते मायेचे अंथरुण

विसावासाठीचे ते एक उबदार पांघरुण !

आई म्हणजे असते दुधावरची साय

कोणी  म्हणे तिला माउली, तर कोणी माय!

आईच्या हातचे कोणतेही अन्न

जिभेला लागे जसे ते पक्वान्न  !

आई जेव्हा फीरवे पाठीवरुन हात

शीण सारा जाई विसरून एका क्षणात!

आईच्या आशीर्वादात एवढी ताकद

कोणत्याही संकटावर मूल सहज करी मात!

आईचे मुलावर प्रेम  निरागस

जसे हरणिचे निष्पाप पाडस !

आईला वाटे आपलं मूल सदाच छोटं

जरी ते झाले कितीही मोठं !

आई जरी असली आपल्यापासून दूर

तिची नजर सतत आपल्या पिंल्लावर!

आईच्या पोटी जन्म घेई साक्षात विधाता

तिला पूजण्यास तोहि माने धन्यता !

Rate this content
Log in