STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

घर...!

घर...!

1 min
209

घर असावे घर सारखे

नकोत नुसत्या भिंती

काय असते घर म्हणजे

कळते घरात राहण्या अंती...!


काम काज करण्यालागी

घरात बसणे अयोग्य ठरे

उरी सुट्टीच्या दिवशी

निवांत राहणे हृदयी सले....


घरच्यांसाठी सुट्टी म्हणजे

मौजमजेचा पर्वणी

बायको हळूच काना मध्ये

आधीच सुट्टीपूर्वी आर्जवी....


उद्या मात्र खरी सुट्टी

कामालाही मिळाली बुट्टी

जमुदे घरच्यांशी गट्टी

जुन्या नात्यांची आठवेल मिट्टी....


आई बाबा बहीण भाऊ

पत्नी सासू सासरे आज्जी आजोबा

मुले मुली म्हेवणे म्हेवण्या

काका काकू मावशी आत्या

नातवंडे परतवंडे सारे मिळुनी घरीच राहु

आलबत्त्या गलबत्त्या एक मुखे गाऊ..


घर घुमूदे आंनदाने

मुक्त होऊया बंधनाने

मोकळे चाकळे जीवन जगुया

परमानंदी चला मनसोक्त न्हाऊया....


सय्यमाची चव थोडी चाखू

कोरोनाला आत्ताच रोखू

प्रतिकाराने पळवून लावू

पुन्हा मोकळा श्वास घेऊ....!


घर म्हणजे काय हे जाणून घेऊ

घराघरातील घरघर सम्पवू

नात्यांचे नवे पुन्हा तलम वस्त्र विणू

क्षणभर का होईना आपले हरी म्हणू....!


Rate this content
Log in