घर...
घर...
1 min
247
सकाळी कुलुप लावुन मंडळी संध्याकाळी परतत होती...
घर मात्र एकटं बरोबर चार भिंती...
आज मात्र परिस्थिती बदलली...
आता नाही कुलुपाला चावी...
कधी नव्हे ते घर कुजबुजतंय...
पाहून आनंदाने घर हसतंय...
सगळेच घरात बसले तर पोटापाण्याचं काय...
घराने घातले देवाला साकडे...
लवकर ही रोगाची पिडा टळू दे... माझी माणसं हसत खेळत कामावरुन घरात येऊ दे...
नाही पाहू शकत त्यांना असे भयभीत
पुढील चिंतेने व्याकुळ झालेले...
