STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Others

3  

Sheshrao Yelekar

Others

घर

घर

1 min
249

माती कवेलूची घरं

सपरी होती मातीची

पंखा नव्हता, लाईट नव्हती

अंगणात झोप रातीची


मातीच्या चौरीत

देव बसले आरामात

हसत मुखी चिंता नव्हती

धाव घरापासून शिवारात


लहाण्यांग मोठ्यांग

अंगणात सरपनाचा ढीग 

भरल्या घरात तांडव नव्हता

गंजाला असायची नेहमी सीग


अंगणी तुळस दारी बिंद्राबण 

रोग लांबच्या हाती

पेज रायता, चहा नव्हता

पाया खाली नेहमी माती


छप्परातून कवडसा

मोजून पाहिले धुलीकण 

शांती शितलता, बेचैनी नव्हती

रमत होता नेहमी मन


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ