STORYMIRROR

Pandit Warade

Others

4  

Pandit Warade

Others

घर

घर

1 min
302

घर म्हणजे नसते

भिंती केवळ सुंदर

तिथे असावे वात्सल्य

प्रेम जिव्हाळा संस्कार।।१।।


अंगणात सदोदित

चाले लेकरांचे खेळ

त्यांचा गोंगाट ऐकून

भासे भरले गोकुळ ।।२।।


खेळ मुलांना खेळाया

तिथे असो पटांगण

चिऊ काऊसाठी दाणे

आणि मोकळे अंगण।।३।।


आल्या अतिथिंचे तिथे

व्हावे स्वागत प्रेमाने

जाऊ नये भिक्षेकरी

कधी रिकाम्या हाताने।।४।।


येण्या घरा घरपण

सुशोभन माणसांचे

अनुभवी वृद्धजन 

हेच वैभव घराचे।।५।


Rate this content
Log in