घन ओथंबून आले
घन ओथंबून आले
1 min
290
चातक तो व्याकुळला
आकाश निरभ्र झाले
बळीराजाही गळाठला
घन ओथंबूनीच आले
ढोलताशांच्या गजरात
मेघांचे आगमन झाले
स्वच्छ धवल आकाश
अभ्राच्छादनही ल्याले
झाडांवर गोळा होऊन
केला पाखरांनी कलरव
पर्जन्यधारा झेलत चोचीं
टिपतील का पाखरे दंव
वृक्ष पानांत सुखावला
थरारली गवताची पाती
वाराही वाहतो अल्लड
सांगे ऊनपावसाची नाती
सर पावसाची ही सरसर
फूटे धुमारा या बीजाला
अंकुरता कोंब शिवारात
मृदगंध चहूकडे फैलावला
डोंगरदऱ्यातून वाहतसे
पाट ओढ्या ओहोळाचे
झरे निर्झर देतसे स्वच्छ
मधूर जलही पावसाचे
