STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

घेराव

घेराव

1 min
371

घेराव घातलाय मला

नका जावूच सोडून

करतेय मी मनधरणी

जाता का मन मोडून


मी हो लाजरी बुजरी

आहे सखीच तुमची

आले तुम्हांस भेटाया

एकली उन्हांतान्हांची


जीव जडला तुम्हांवर

नका करू खप्पामर्जी

दिलाचं दिलवर तुम्हीं

करते हात जोडून अर्जी


पाटील तुम्हीच तालेवार

जरीपटका घालू डोईवर

करूनी तुम्हांस विनवणी

या भेटाया मला वरचेवर


वाटंत टपल्यात लांडगं

नाही कुणी तुम्हांवाणी 

जिभा काढती लालचेनं

दावा हिसक्याचं पाणी


Rate this content
Log in