घे उंच भरारी
घे उंच भरारी
1 min
31K
विशाल आभाळी
घे उंच भरारी
मनगटी बळ
बाणा ही करारी
जिद्द, सामर्थ्याने
आकाश तू व्याप
हाती आहे तुझ्या
कर्तव्याचे माप
पादाक्रांत कर
सर्वच शिखरे
उजळू दे रूप
सर्वस्व निखरे
तुझ्या या यशाने
जळू दे लोकांना
तुझ्या कर्तृत्वाने
आनंद सर्वांना
यशोदीप लाव
ही एकच इच्छा
तुझ्या यशासाठी
हार्दीक शुभेच्छा
