STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

घडणार घडत राहत..

घडणार घडत राहत..

1 min
178

घडणार असत ते घडत राहत

त्यावर कोणी हसत तर कोणी रडत राहत  


कुणाचे स्वप्न सत्यात उतरतात

 तर कुणाचे आयुष्य 

उद्ध्वस्त होतात 

आयुष्याच्या खेळात 

अस घडत राहत

 

मनातल्या अबोल भावनांना कोणी समजत नाही

 शब्दात लिहलेले दुःख कोणी जाणत नाही  

दोन शब्द आजकाल जिव्हाळ्याचे 

कोणी बोलत नाही 

आपण एकटेपणात रडतांना 

कोणीच का? सोबत रडत नाही

 का? असे होते नेहमी 

खरच काही कळत नाही 


 आपलेच सोडतात साथ आपली 

परकी कधी आपली होत नाही

घडणार घडत त्यावर साधा विचार ही कोणी करत नाही

 कोणाला किती आपल करा

 कोणीच कुणाच काहीच

 लागत नाही  

हारणारे नेहमी हारत नाही 

जिंकणारे नेहमीच जिंकत नाही 

हारणारेही कधीकधी असे उडतात की पुन्हा जमिनीवर उतरत नाही आणि जिंकणारे कधीकधी असे आपटतात 

की उडायचे पुन्हा स्वप्न 

ही पाहत नाही 

घडणार असत ते घडत

 वेळ बदलते, माणस बदलतात 

पण आयुष्य कुणासाठीही 

थांबत नाही  

घडणार असत ते घडत राहत

 बदल हेच आयुष्य असत

 हे बऱ्याच जणांना शेवटपर्यंत कळत नाही...


Rate this content
Log in