घात
घात
मला माझ्या घरापासून खूप लांब जायचंय,
पण कुठे जाणार आहे तेच माहित नाही...
आयुष्याच्या एका वळणावर ...
तिचं एक पाऊल चुकीचे पडले.
आणि साऱ्यांची मने तिच्याविषयी कलूषित झाली.
मग तिच्या मनात असा विचार येणं चुकीचे आहे का?
काय करावं सुचत नाही,
मनाला काही रूचत नाही,
कसं वागावं कळत नाही,
विचारांचे काहूर हटत नाही.
कुणास ठाऊक मला काय झालय,
डोकं तर नुसते फिरून गेलय,
मनातल्या साऱ्या भावनांना,
दुःखात ते लोटून गेलय.
सगळ्यानी मला दूर लोटलय,
आता या आयुष्यात काय उरलय,
माझ्या विषयी साऱ्यांची मनं,
अतोनात तिरस्कारानी भरलय.
एक मन म्हणतय संपव आयुष्य,
दुसरे मन मन म्हणतय नको..
एक मन म्हणतय जा कुठे दूर दूर,
मनुष्य जीवन मिळते एकदाच...
घात करून घेण्याचा विचारही नको.
