STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

गगनराज

गगनराज

1 min
148

तेजोनिधी तू भास्कर 

प्रकाशाचा अधिपती

सृष्टी चराचर चाले

तव तेजोमय दिप्ती


प्रकाशले सारे विश्व

मित्रा सोनकिरणांत

शक्ती उर्जा स्फूर्ती तेज

झळाळते रवि तेजात


तम निशेचा सारथी

भास्कराचे तेजोकण

भार सृष्टीचा पेलतो

तेजोनिधी हर क्षण 


तेजोमय किरणांचे

बल अनाकलनीय

कोविडचा नाश करी

जगताला वंदनीय


जन्मदाता कर्ता त्राता

सर्वेसर्वा वसुधेस

भावे कृतज्ञ वंदन

आदित्यनारायणास


साहित्याला गुण द्या
लॉग इन