गडकिल्ले
गडकिल्ले
1 min
304
जन्म घेतला जिजाउपोटी
किल्ल्यावर त्या शिवनेरी ,
बालवयातच स्वराज्यासाठी
घेतली तलवार करी !
गडकिल्यांचे करण्या रक्षण
दिले कित्येक मावळ्यांनी बलिदान
मावळे अन् गडकिल्ले
होती स्वराज्याची शान !
रक्षणासाठी स्वराज्याचे गड
कित्येक सिंह लढण्या गेले ,
देऊन आपले बहुमोल प्राण
राजाच्या यज्ञात कामी आले !
महाराजांचे गडकिल्ले
होती त्यांची संपत्ती ,
जिच्यामुळे नाही आली
कधीही स्वराज्यावर आपत्ती !
छत्रपतींची कीर्ती आजही
त्यांचे गडकिल्ले सांगतात ,
रक्षणासाठी ते आज
मावळे स्वराज्याकडे मागतात !
