Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Medha Desai

Others

3  

Medha Desai

Others

गडकिल्ले

गडकिल्ले

1 min
145


महाराष्ट्रातील गडकिल्ले म्हणजे

भूषण आहेत अवघ्या देशाचे

त्यांच्या नसानसात शिवबाचे शौर्य दडले

दिव्य पराक्रम ठरले अभिमानाचे १


शिवनेरी,रायगड,सिंहगड,जंजिरा

वेगवेगळे वैशिष्ट्य आहे प्रत्येकाचे

इतिहसातही जपले त्यांचे अढळ स्थान

विशालतेतून दिसणाऱ्या निसर्ग सौंदर्याचे २


भव्यता दिसते बळकट किल्ल्यांची 

मजबूत तटबंदीने बांधलेली

तोफखाना,बुरूज,मंदिरांच्या पवित्र वास्तूंनी

सर्व किल्ल्यांची शोभा वाढलेली ३


चोर दरवाजा,पुरातन वास्तूंनी नटला

मजबूत बांधणीतून चौफेर नजर फिरणारी

देशाचे ऐतिहासिक महत्त्व वाढवून

किल्ल्यांची दुनिया आनंद देणारी ४


पाण्यातील किल्ल्यांचे सौंदर्य पाहून

अभिमानाने ऊर भरून येतो

शिवबाने जिंकले गनिमी काव्याने

किल्ला त्यांच्या परीसस्पर्शाने उज्ज्वल होतो ५


गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राची शान

त्यात शिवबाची शौर्यगाथा जपलेली

अवघ्या त्रिखंडात खोवला शिरपेचात तुरा

किल्ल्यांनी साऱ्या देशाची मान उंचावलेली ६


Rate this content
Log in