STORYMIRROR

Sunita Ghule

Others

3  

Sunita Ghule

Others

गडकिल्ले

गडकिल्ले

1 min
348

सह्यगिरीच्या दऱ्याखोऱ्यात

शिवबा छत्रपती प्रजादक्ष

स्थापिले हिंदवी स्वराज्य

गडकिल्ले इतिहासा साक्ष


कोंढाणा किल्ला सर करून

बांधले स्वराज्याचे तोरण

प्रत्येक गड जिंकताना

मातेच्या वचनाचे स्मरण।


निवडून एक एक भव्य डोंगर

बांधिले मजबूत गडकोट

रायगड,प्रतापगड किल्ले भूईकोट

स्वराज्याचे संरक्षक भक्कम तट।


प्रत्येक गडावर टाक्या तलाव

शिवरायांच्या दूरदृष्टीचे द्योतक

विकसित स्थापत्यशास्त्राचा अविष्कार

आधुनिक स्थापत्यकलेला प्रेरक।


राज्यभिषेकाचा मान रायगडाला

वसवली राजगडावर राजधानी

विशालगड,सिंहगड,अजिंक्यतारा

छातीचे कोट करुन सांभाळले वीरांनी।


जलदुर्गाचा रूपाने आरमार

किनारपट्टीवर करडी नजर

शिवबांनी ओळखला धोका

शस्त्र रोखले सागरी शत्रूवर।


अभिमान हिंदुत्व प्रेमाचा

गडकिल्ले राष्ट्रीय स्मारक

राजांच्या कर्तृत्वाचा पुरावा

जपूया वारसा बनूया तारक


मद्यपीच्या त्याज्य वर्तनाने

किल्ल्यांची प्रतिष्ठा धोक्यात

संवर्धन गडकोटांचे होणे

गरजेचे आजच्या काळात।



Rate this content
Log in