गढुळ कोपरा
गढुळ कोपरा
1 min
388
कविता लिहावी म्हणतोय
नात्याच्या धारेवर
सावरलेल्या हुदंक्यांवर
काळजातल्या काळ्या ढगावर
नाचणाऱ्या मोरावर
हरवलेल्या चित्तावर
गारांच्या पावसावर
गुलाबी गारठ्यावर
भिजलेल्या गाण्यांवर
वेड्या वाऱ्यावर
अस्तित्वाच्या कापसावर
शांततेच्या आवाजावर
पण......
मनातला एक गढुळ कोपरा
यातल्या एका विषयावरही
मला लिहू देतच नाहीय
शब्दही साथ देत नाहीत
मग कधी आणि कशी
पूर्ण होणार माझी कविता
