गड किल्ले
गड किल्ले
1 min
350
साष्टांग नमन तुम्हा शिवराय
वंदन करितो रयत राजाला
जन्मलो या माय भूमीत
अभिमान हा मनाला
छत्रपती जन्मले गड तो शिवनेरी
पवित्र जाहली धरती महाराष्ट्राची
जिंकला किल्ला पहिला तो तोरणा
मुहूर्तमेढ केली साम्राज्याची
श्रीमंत ही भूमी गड किल्ल्याची
वारसा जपूया प्राणपणाने
जाती पेक्षा माती मोलाची
शीक दिली शिवरायाने
वधला अफजलला त्या
जिंकले शौर्याने वाईला
शक्ती पेक्षा युक्ती महान
सलाम त्या करामतीला
शपथ घेतलि रायरेश्वरावर
स्थापन करण्या स्वराज्य
लढले आजन्म जीवणीशी
सुरक्षित ठेवले मराठी राज्
