गड किल्ले
गड किल्ले
सुतौडा नायगाव किल्ला
सोयगाव तालुक्यातला
प्रचंड कातळच कोरून
बुरुज प्रवेशद्वार बांधलेला
पश्चिमाभिमुख उंच प्रवेशद्वार
बांधणी भक्कम तटबंदीची
गोल छिद्राचे झरोके ठेवलेत
शरभ शिल्प मार्ग फरसबंदीची
दिसतेय शिरविरहित मूर्ती
किल्ल्यातील शेतात नंदीची
टेकाडावर घूमटी दिसते
प्राचीन देवता आईमाईची
आहे खांब टाक गडावर
स्वच्छ व गार पाणी भरलेलं
मशीद आणि पिराच्या कबरी
किल्ल्याचे जुने अवशेष उरलेलं
चोर दरवाजाच्या खाली
दिसती कातळातली लेणी
जोगवा मांगीणीचं घर दिसे
नामकरण केले तिथं कोणी
द्वारपट्टीवर महावीराची प्रतिमा
दालनात मूर्ती मायलेकरांची
कातळात कोरीव प्राचीन पायऱ्या
भिंतीमध्ये दिसे मूर्ती गंधर्वाची
