STORYMIRROR

Sarika Musale

Others

3  

Sarika Musale

Others

गड किल्ले

गड किल्ले

1 min
277

गड किल्ले


शान आहे महाराष्ट्राची

आठवण आपल्या शिवबांची

जपणूक करुयात आपण सगळे

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची


पराक्रमाची शर्थ केली

शूर पराक्रमी मावळ्यांनी

ते गड-किल्ले पावन झाले

शिवबाच्या पावलांनी


अशा गड-किल्ल्यांचे जतन करण्याची

वेळ आता आली आहे

पुढच्या पिढीसमोर शिवबांचा आदर्श 

ठेवण्याची वेळ आता आली आहे


बुरुजांवरती नावे लिहून

अपमान करु नका वास्तूंचा

मावळ्यांच्या बलिदानाचे भान ठेवून

वारसा जपू संस्कृतीचा


स्वच्छता ठेऊ सुंदरता राखू

या ऐतिहासिक वास्तूंची

अस्मिता जपू मनी ठेवू

निर्जीवातल्या सजीव आठवणींची


Rate this content
Log in