STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

गड किल्ले...!

गड किल्ले...!

1 min
256

गड किल्ले अस्मिता आपली

सदैव उरी शास्वत कोरलेली

संस्कृतीची अनमोल ठेव ही

हृदयी सदा वसलेली....


कित्येक आले कित्येक गेले

राहिले फक्त गड किल्ले

म्हणतो आपण अभिमानाने

मराठ मोल बल्ले बल्ले....


मजबूत ठेवण त्यांची

शिकविते कणखर बाणा

ताठ मान सदैव राही

पाठीचा ठेऊन ताठ कणा....


प्रेम माया ममता आणि विश्वबंधुता ही 

गडकिल्ल्यांची आपली पुंजी

सदा सर्वकाळ घालते मनामनात

एक प्रेमभावाची अवीट रुंजी....


गडकिल्ल्यांच्या दर्शनाने निव्वळ

छाती आपली फुलून येते

गत वैभवाची जणू आपणास

हरघडीस जी वेळोवेळी साक्ष देते. ..


निधडी छाती निधडा बाणा

उभा ठाके मर्द मावळा

उंच आकाशी उडता उडता

स्वप्न सुंदर पाही इथला बावळा...


जय भवानी जय शिवाजी

मंत्र हृदयी सदा वसे

जळी काष्ठी पाषाणी

अविरत शिवबा चौफेर इथे दिसे....!


Rate this content
Log in