गड - किल्ले
गड - किल्ले
1 min
430
महाराष्ट्रात अनेक गड किल्ले
मावळे उडवी मिशांचे कल्ले । १।
म्यानातून काढती तलवारी
मुघलांशी करिती मारामारी ।२।
एक -एक गडकिल्यांची कमाई
वाहिली जिजाऊ शिवबांच्या पायी ।३।
लक्ष लक्ष मोहरा
मावळ्यासंगे खेळती भोवरा ।४।
शिवनेरी झाले शिवजन्म स्थान
प्रतापगडी अफजल समाधीस्थान ।५।
तानाजी कोंढाणा सरला
तिथचं धारातीर्थी पडला ।६।
घोडखिंडी बाजी प्रभू लढला
तोफेचे आवाज ऐकूनिच पडला । ७।
रायगडी झाला राज्याभिषेक
रयतेचा वाली शिवबा निरपेक्ष ।८।