STORYMIRROR

Umakant Kale

Others

3  

Umakant Kale

Others

गड किल्ला

गड किल्ला

1 min
209

इतिहासाचा अमुल्य ठेवा,

स्वराज्याची अमुल्य देण ही,

मांगल्याची भेट ही,

संवर्धन करून त्यांचे, जतन होई इतिहासाचे


असंख्य वैऱ्याचे झेलून वार,

त्यांच्या बलिदानाचे जिवंत ज्वार,

ताफा,सैन्य शत्रुचा तो वार,

झेलूनी उभा हा माझा यार,

संवर्धन करून त्यांचे, जतन होई इतिहासाचे


पताका स्वराज्याची इथेच फळकली,

अस्मिता मराठ्यांची येथेच जागली,

स्वप्न स्वराज्याचे यानेच होते पाहीले,

जेव्हा शिवबा मराठा माती साठी लढले,

संवर्धन करून त्यांचे,जतन होई इतिहासाचे,


असे वैभवशाली हे गड लाभले,

पण आज किती पडझड त्यांचे झाले,

ना बुरूज कुठला शिल्लक उरला,

किल्ला आता इतिहासाच्या पुस्तकात उरला,

संवर्धन करून त्यांचे, जतन होई इतिहासाचे,


        


Rate this content
Log in