गौरी
गौरी
1 min
36
रांगोळीच्या पावलांनी
सजते दारात
समृद्धीच्या सोनपावलांनी
येते घरात
गौरीच्या आगमनाने
वाटे प्रसन्न
होई घरात
खास पंचपक्वान्न
आल्यावर घेते
थोडा विसावा
काय तिचा
महिमा वर्णावा
केली जाते
हारमाळांनी सजावट
जपला जातो
घरोघरी थाटमाट
