STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

गौराईंचा जागर

गौराईंचा जागर

1 min
194

आल्या आल्या गौरीबाई

बाई सोनपावलानं

आता हसू नाचू खेळू

करु या गं जागरण   //धृ//


करु आरास साजेशी

गोडधोड नैवेद्यासी

विडा ठेवू खावयासी

लवंगांनी बांधायासी 

कसे उमलले मन !!   (1)


गप्पागोष्टी तिजसंगे

सांग मनातले सारे

गोड गाणी तिजसवे

ऐकताना भान हरे

पिसापरि झाले मन !!   (2)


साथ झिम्मा फुगड्यांस

भेंड्या लावी उखाण्यांस

किती उखाणे सरस

लज्जा आरक्त गालांस

जागू हसून खेळून     (3)


उद्या पाठवणी दिन

येती डोळे गं भरुन

लेक राही दिस तीन

वाहे गंगा डोळ्यांतून

रीत जगाची ही जाण   (4) 


पाही वळून वळून

मन घेई आवरुन

तीन दिसांचे माहेर

बहरले तन मन

मनी दाटे आठवण    (5)


साहित्याला गुण द्या
लॉग इन