गौण
गौण
1 min
139
समाजात स्त्रीला
का समजले जाते गौण
कितीही झाले अन्याय तिच्यावर
तरी का वाटते ती रहावे मौन
स्त्री जन्मली का समजतात सजा
करून भ्रूणहत्या
गर्भातच का करतात तिला वजा
जगात येण्याआधीच
आईच्या पोटातूनच का
घ्यावी लागते तिला रजा
प्रत्येकाला पाहिजे वंशाचा दिवा
काही दिवे इतरांच्या घरातील पणती विझवतात
असा हैवान राक्षस का हवा
होत नाही का हुंडाबंदी
स्त्रीला छळण्यासाठी का देतात
समाजातील लोकच नवीन नवीन संधी
स्त्री भ्रूण हत्येला टाळा
सरकारी नियम पाळा
असू द्या तिचा समाजावर विश्वास
घेऊद्या तिला मोकळा श्वास
