STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Others

3  

.प्रमोद घाटोळ

Others

गावरान सुशिक्षितांनो

गावरान सुशिक्षितांनो

1 min
234

महालात राहणाऱ्या गावरान सुशिक्षितांनो

झोपडीतपण माणसंच राहतात

हाडामासाचे

तुमच्याचसारखी


त्यांनाही आहेत भावना

जी असते प्रत्येक जिवंत मेंदूत

वाटतं त्यांनाही महालात रहावं

भारी वस्त्र अंगात घालावी

तुमच्याचसारखे मुलायम भरजरी


वाटतं सदऱ्यावर नेकटाय लावून

सुटाबुटातला साहेब व्हावं

ऑफिसमध्ये बसावं

फिरणाऱ्या खुर्चीतल्या माणसागत

तुमच्याचसारख हुबेहुब


पण तुम्ही श्रीमंतांनीच तोडलेत गरीब, वनवासींचे पंखं

भ्रष्टाचार अन् हातातल्या कलमेच्या बंदुकीनं

केलात त्यांच्या स्वप्नांचा चुराडा

बांधलेत महाल अन् मॉल

तुमच्या श्रीमंतीच दर्शन घडविणारे 

शापित विटांच्या भिंतीचे


जे भूकंपाच्या पहिल्या झटक्यात कोलमडेल

क्षणात संपेल तुमचा डोंबाऱ्याचा स्वार्थी खेळ 

अन् उठतील आर्त किंकाळ्या

इतरांना सतर्कतेचा इशारा देणाऱ्या

तुमच्याच बेशुद्ध डोळ्यासमोर

मात्र तुमचा प्राण पाखरू झाला असेल

अन् शरीर थंड


Rate this content
Log in